मुंबई

पेट्रोल पम्पावर राडा घालणारे ताब्यात

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः पेट्रोल पम्पावर पेट्रोल भरण्याच्या वादातून धक्काबुक्की झाल्याचा आणि बाचाबाची झाल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला. बैल बाजार येथील हिंद ऑटोमोबाईल पेट्रोल पम्पावर ही घटना घडली. याप्रकरणी पेट्रोल पम्पाचे मालक शैलेश काकराणी यांच्या तक्रारीवरून मुकलीस फक्की (वय ३०) आणि जावेद डॉन (वय ३७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुकलीस आणि जावेद हे दोघे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. या वेळी रांगेतून न येता त्यांनी पोट्रोल भरण्यास सांगितले. तेव्हा पम्पावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना रांगेत येण्यास सांगितले; पण मुकलीस आणि जावेद यांनी सौरभ या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर पेट्रोल भरण्याचे नोझेल हातात घेऊन त्यांनी पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण या झटापटीत नोझलचा चाप दाबला गेल्याने पेट्रोल बाहेर उडाले. तेव्हा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवीगाळ करत दोघांनी तिथून काढता पाय घेतल्याचे तक्रारीत सांगण्यात आले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! 4 दिवसांत 100 ग्रॅममागे तब्बल 60,000 रुपयांनी महागलं; मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Fifa World Cup 2026: जपानच्या प्रशिक्षकाच्या 'फलका'ची चर्चा; नेदरलँड्सला रडवलं, मॅच होताच असं काही केलं की, ज्याने जिंकली मनं... Video

SCROLL FOR NEXT