मुंबई

अग्निशमन दलाच्या जवानांना पदके प्रदान

CD

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) ः भारत सरकारने जाहीर केलेली पदके उल्हासनगर महापालिकेतील अग्निशमन दलाच्या जवानांना आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी राष्‍ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त १९४४ च्या आगीत शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यात ६६ जवान शहीद झाले होते.

अग्निशमन दिनानिमित्ताने अग्निशमन दलाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्त अजीज शेख व इतर अधिकाऱ्यांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. तसेच, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारने २६ जानेवारी रोजी जाहीर केलेली पदके अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांच्यासह १० जवानांना प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, प्रशासनाधिकारी अशोक मोरे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, भांडार विभागप्रमुख अंकुश कदम आदी उपस्थित होते. तसेच पालिकेच्या प्रांगणात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर यांनी जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT