मुंबई

मुंबईकरांची पसंती एसी लोकलला

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मध्य रेल्वेच्या १७० वर्षपूर्तीनिमित्त मुंबईतील सर्व प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित, सुखकर, आरोग्यदायी प्रवासासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. या ऑनलाईन सर्वेक्षणात ७६.७ टक्के प्रवाशांनी वातानुकूलित लोकलला सुरक्षित, सुखकर, आरोग्यदायी प्रवासासाठी पसंती दिली आहे.
मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रवाशांकडून ऑनलाईन सर्वेक्षणात प्रवासी संघटनांकडून करण्यात आले. या ऑनलाईन सर्वेक्षणात प्रवाशांना ‘तुम्ही नियोजित वातनाकूलित रेल्वेला पाठिंबा देता का,’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला ७६.७ टक्के प्रवाशांनी पाठिंबा दिला; तर त्यातील ३९.८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे भाडे हे प्रथम श्रेणी तिकिटाप्रमाणे असावे, अशी मागणी केली. प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये फक्त एकच एसी डब्याच्या मागणीला तुम्ही पाठिंबा देता का, यावरही ७० टक्के प्रवाशांनी पाठिंबा दिला असून त्यापैकी ४५ टक्के जणांनी एसी लोकलचे भाडे हे प्रथम श्रेणी तिकिटाप्रमाणे असावे, अशी मागणी केली. मुंबईतील इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा रेल्वे प्रवास स्वस्त असल्याचे प्रवाशांनी मान्य केले असून बस, रिक्षा, टॅक्सीच्या मुंबईतील इतर वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेचे भाडे खूपच कमी आहे, यावर ८७ टक्के प्रवाशांनी होकार दिला आहे.
...
१ ते ४ रेल्वे मार्ग लोकलसाठी राखीव ठेवा!
उत्तम सुरक्षिततेसाठी तुम्ही एकत्रित एसी आणि एकत्रित महिला कोचच्या बाजूने आहात का, याला ७१.२ टक्के प्रवाशांनी होकार दिला आहे. पाचवी व सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलला दररोज लेटमार्क लागतो. त्यामुळे १ ते ४ रेल्वे मार्ग लोकलसाठी राखीव ठेवण्यास ९४.२ टक्के जणांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई रेल्वेतील सुधारणांबाबत ६५.४ टक्के मुंबईकर समाधानी आहेत. विकासकामांच्या मागणीत आडवे येणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला ८७.४ टक्के प्रवाशांनी पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT