मुंबई

मुलीच्या अपहरणप्रकरणी तरुणाला अटक

CD

मुलीच्या अपहरणप्रकरणी तरुणाला अटक
अंधेरी, ता. १८ (बातमीदार) ः उत्तर प्रदेशातून एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मनीष राजवीर शर्मा याला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ग्रँट रोड परिसरात संशयास्पद फिरताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली. चौकशीदरम्यान मनीषने उत्तर प्रदेशातून मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस झाले. दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात आला आहे.
संबंधित मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी उत्तर प्रदेशात केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्याच गुन्ह्यात डी. बी. मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली. उत्तर प्रदेशातील पोलिस पथक मुंबईत आल्यानंतर दोघांना त्यांच्याकडे सोपवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT