मुंबई

कोंडीतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची कसरत

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १ : कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची रोजची डोकेदुखी झाली आहे. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी दुचाकीस्वार मिळेल त्या चिंचोळ्या मार्गातून आपली दुचाकी काढताना दिसतात. आता तर या दुचाकीस्वारांनी हद्दच केली आहे. चक्क पाण्याच्या पाईपलाईनमधून चालकांनी मार्ग काढत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. देसाई गावाजवळील हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
कल्याण-शिळ रोडचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या या कामामुळे या मार्गावर सकाळ-संध्याकाळ प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनांची वाढलेली संख्या, कल्याण-शिळ रोडचे काही ठिकाणी रखडलेले रुंदीकरण, रस्त्याची सुरू असलेली कामे आदी अनेक कारणे या कोंडीस कारणीभूत आहेत. देसाई गाव, काटई नाका, पलावा जंक्शन अशी कोंडीची अनेक ठिकाणे आहेत. चारचाकी वाहनांच्या रांगा इथे लागत असल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेने, विरुद्ध दिशेने, कच्चा रस्ता तसेच मिळेल त्या अरुंद मोकळ्या जागेतून मार्ग काढताना दिसतात. या दुचाकीस्वारांमुळे अनेकदा कोंडीत भर पडते.
.....
बेशिस्तपणामुळे कोंडीत भर
दुचाकीस्वार कोंडीतून कसे वाहन काढतील याचा काही एक नेम नसताना आता एक नवा मार्ग दुचाकीस्वारांनी देसाई गावाजवळ शोधून काढला आहे. चक्क पाईपलाईनमधून मार्ग काढून तेही विरुद्ध दिशेने वाहन चालवत मार्गस्थ होत आहेत. आधीच वाहतूक कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने इतर वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT