मुंबई

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत कार्यशाळेची मागणी

CD

तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या वर्षापासून होत आहे. नवीन धोरणात पदवी स्तरावरील क्रेडिट गुणांकन, विषय निवडीतील स्वातंत्र्य, इयत्ता दहावीची परीक्षा बोर्डाची असेल किंवा नसेल, मुलांना इयत्ता दहावीचा अभ्यास करण्यासाठी खासगी क्लासेस लावावेत किंवा कसे? इयत्ता नववीची परीक्षा बोर्डाची असेल का? असे बरेच समज-गैरसमज पसरले आहेत.
विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी कार्यशाळा राबवावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणून पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण नक्की कसे असेल? बदलत्या शैक्षणिक परिस्थितीला सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे? अशा अनेक शंका विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचरण करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT