मुंबई

पदपथावरील डेब्रिजमुळ नागरिकांची गैरसोय

CD

जुईनगर, ता. २२ (बातमीदार) ः नवी मुंबईमध्ये पालिकेची विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे चालू आहेत. पालिकेच्या माध्यमातून गटारांची कामे चालू आहेत; मात्र गटारातील गाळ किंवा बांधकामाचे साहित्य हे पदपथ किंवा रस्त्यावर टाकलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना चक्क पदपथ सोडून रस्त्यावर येऊन चालावे लागत आहे.

सानपाडा, जुईनगर, नेरूळ विभागातील पदपथ आणि रस्त्यावर ठिकठिकाणी डेब्रिजचे ढीग पडलेले आहेत. त्यामध्ये गटारातील गाळ, बांधकामाचे साहित्य तसेच इतर साहित्य पडलेले आहे. त्यामुळे परिसराला बकालपणा आला असून पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना बांधकामाच्या साहित्याच्या डेब्रिजचा आणि गाळाच्या ढिगांचा त्रास होत आहे. पदपथ किंवा रस्त्यावर टाकलेल्या या डेब्रिजच्या आणि गाळाच्या ढिगांमुळे छोटेमोठे अपघात होऊ शकतात. तसेच हे खराब सामान दिवसेंदिवस पडून राहिल्यामुळे यात विंचू, गोम, साप अशा प्राण्यांची पैदास होऊ शकते. पदपथावरून जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डेब्रिजचे सामान टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे; तर रस्त्यावरील ठिकठिकाणी टाकलेला गाळ लवकरात लवकर उचलण्याची मागणीही नागरिक करत आहेत.

शहरात अतिक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य वर्दळीच्या रस्त्यावर आणि पदपथावर सर्रासपणे ठेवले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. दुसरीकडे गटारातील खराब गाळाचे ढीग रस्त्यावर असल्यामुळे घाण वास येत असून गाळाच्या ढिगांचा पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

Pune News: शासन निर्णय लवकरच! प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा अनिवार्य; राज्य शिक्षण आयुक्तांची माहिती, पालकांना दिलासा!

Rahuri Bypoll: प्राजक्त तनपुरे यांची माघार; रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई, अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा?

Latest Marathi News Live Update : रायगडच्या कोर्लाई गावात भिषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT