मुंबई

खारघरप्रकरणी मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी

CD

खारघर, ता. २२ (बातमीदार) : महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्यू झाल्याप्रकरणी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आपच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीचे लेखी निवेदन खारघर पोलिसांकडे दिले आहे.

खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १३ श्री सेवकांचा मृत्यू झाला. या सोहळ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, असे आपच्या वतीने सांगण्यात आले. आम आदमी पक्ष्याच्या महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थनिक कार्यकर्त्यांनी एमजीएम रुग्णालय, कंळबोली तसेच टाटा रुग्णालय, खारघर येथे जाऊन आजारी श्रीसदस्यांची भेट घेऊन चौकशी केली. निवेदन देताना आपचे महाराष्ट्र राज्य समितीचे राज्य सचिव धनंजय शिंदे, कोकण विभाग संयोजक डाॅ. अल्तमश फैजी, पनवेल अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग जगन्नाथ शेरे तसेच योगेश तिरूवा, मनोज घरत, भोलाकुमार सोनार आणि स्थानीक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT