मुंबई

जनता दलाच्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

CD

पालघर, ता. २२ (बातमीदार) : जनता दल सेक्युलर, आदिवासी एकता व भूमी सेना यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील जनता दलातून निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. पालघर जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत जनता दलातून निवडून आलेल्या उमेदवारामुळे पक्षाला नवीन उभारी, नवीन बळ मिळाले आहे. निवडून आलेल्या उमेदवार यांनी आपल्या कामातून गावचा विकास करावा व आपल्या पक्षाचे नाव उंचावावे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे शेवाळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या वेळी जनता दलाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर, राजा म्हात्रे, राजेंद्र राऊत, गणेश वावरे, रजनी सांबरे यांच्यासह निवडून आलेल्या उमेदवारांनी ही आपली मते मांडली. या कार्यक्रमासाठी महासचिव ज्योती बडेकर, प्रकाश लवेकर, सुभाष मोरे, अरविंद पाटील, चंद्रकांत साखरे, राजू मोर्या, गणेश तांबडी, विष्णू जाधव, भरत पागी, किरण शेठ, वसई जिल्हा अध्यक्ष कुमार राऊत, सतीश वारेकर, भगवान साळवी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT