मुंबई

धूम स्टाईलने दुचाकीस्वाराच्या मोबाईलची चोरी

CD

भिवंडी (बातमीदार) : भिवंडी-कल्याण रस्त्यावरून दुचाकीस्वार जात असताना पाठीमागून स्कुटीवरून आलेल्या दोघांनी त्याचा मोबाईल खिशातून काढून धूम स्टाईलने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील टेमघर येथे राहणारा जालिंदर लक्ष्मण बळे हा ११ एप्रिल रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पत्नी आणि मुलासह दुचाकीने उल्हासनगर येथील घरी जात होता. पिंपळघर येथील प्राणायू हॉस्पिटलजवळ साडीच्या दुकानासमोर पोहचला असता, त्याच्या पाठीमागून स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याच्या दुचाकीजवळ येऊन जालिंदर याच्या खिशातील मोबाईल हातचलाखीने चोरून चोरटे पसार झाले. या चोरीच्या घटनेची नोंद कोनगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT