मुंबई

पावसाळ्यापूर्वी रेल्वे स्थानकातील घसरगुंडी लागणार का ?

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यांची सोय करण्यात येत आहे. डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानकातही सरकत्या जिन्यांची कामे सुरू आहेत. परंतु गेले काही महिन्यांपासून ही कामे थंडावली असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सरकत्या जिन्यांसाठीची बांधकाम विभागाची कामे पूर्ण झाली आहेत, मात्र विद्युत विभागाकडून सरकत्या जिन्याची व्यवस्था झाली नसल्याने ही कामे रखडली असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. दोन महिन्यांत पावसाळा सुरू होईल, रेल्वे स्टेशन परिसरातील सरकत्या जिन्यांची कामे कधी पूर्ण होणार या स्वरुपाचे ट्विट काही जागरुक नागरिकांनी रेल्वे प्रशासनास केले आहे. त्यावर रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात काम पूर्ण होतील असे उत्तर त्यांना दिले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवली हे रेल्वे स्थानक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकात फलाट क्रमांक तीन आणि चारवर मध्यभागी असलेल्या ब्रीजला सरकता जीना बसविण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या जिन्याचे काम सुरु असून त्यासाठी फलाटावर खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. या खोदकामामुळे रेल्वेतून फलाटावर उतरणाऱ्या प्रवाशांना अनेकदा कसरत करावी लागते. तसेच फलाटावरून गर्दीच्या वेळेस ये जा करतानाही त्रास सहन करावा लागतो. या खड्ड्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. विद्युत विभागाकडून सरकत्या जिन्याचे काम हाती घेण्यात येत नसल्याने पाच महिन्यांपासून प्रवासी सरकता जिन्याचे काम कधी पूर्ण होणार या प्रतीक्षेत आहेत. डोंबिवली सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे हे माहिती असूनही या स्थानकातील जिन्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
....
मे महिन्यात काम पूर्ण
ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम अर्धवट स्थितीत आहे. जागरुक नागरिक मंदार अभ्यंकर यांनी नुकतेच याविषयी रेल्वे प्रशासनाला ट्विट केले आहे. दोन महिन्यांवर पावसाळा आला आहे. ठाकुर्ली स्टेशनची ही घसरगुंडी कधी सुरू होणार, असा सवाल त्यांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे. तसेच त्याच्या आजूबाजूला दगड, माती, कचरा, काँक्रीटची पोती पडून आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला रेल्वे प्रशासनाने उत्तर देताना मे महिन्यात याचे काम पूर्ण होईल असे उत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT