मुंबई

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला चाप लावणार

CD

विरार, ता. २२ (बातमीदार) : खासगी लक्झरी बस मालकांकडून होणारी प्रवाशांची मनमानी लूट थांबवण्याकरता भरारी पथकांच्या माध्यमातून या बसची पाहणी करण्यात येईल. तसेच प्रवाशांकडून अवाजवी पैसे घेणाऱ्या ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिले. याबाबत अनेक राजकीय पक्षांनी परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेण्यात आल्याने कोकणवासीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
वसई, विरार ते डहाणूपर्यंतच्या उपनगरातील कोकणवासीय एप्रिल-मे, होळी, महाशिवरात्री आणि गणेशोत्सवाच्या काळात विरारहून कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. अशा वेळी कोकणातील चाकरमानी विरार येथून सुटणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसने कोकणात ये-जा करण्याचा पर्याय निवडतात; मात्र खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या गरीब कोकणवासी चाकरमान्यांची या काळात प्रचंड प्रमाणात आर्थिक लुटमार करतात. विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक आणि परिवहन विभागाचे काही संबंधित अधिकारी यांच्या संगनमतातून यापूर्वीही गणेशोत्सवापासून ते थेट दसरा, दिवाळी, शिमग्यापर्यंतच्या सणासुदीच्या काळात कोकणवासीयांची आर्थिक लुटमार होत आलेली आहे.

--------------
विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसाठी निश्चित करून दिलेले दर जाहीर करतात; परंतु प्रत्यक्षात मात्र या नियमांची अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दराच्या दीडपट भाडे आकारणे खासगी ट्रॅव्हल्सने अपेक्षित आहे. त्यापलिकडे भाडे घेतले जात असल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT