मुंबई

सेवानिवृत्त पोलिसाची हत्या

CD

बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : उसने पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्याने सेवानिवृत्त पोलिसाची हत्या करून त्यांचा मृतदेह धरण परिसरात दलदलीच्या जागेत पुरण्‍यात आला. याप्रकरणी एका व्‍यक्‍तीला व त्याच्या साथीदाराला बदलापूर पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर पश्चिम भागात राहणारे अशोक मोहिते हे सेवानिवृत्त तुरुंग विभागातील पोलिस १२ एप्रिलपासून मांजर्ली, बदलापूर पश्चिम येथून बेपत्ता झाल्याने त्यांचा मुलगा अमित यांनी वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. ते हरवल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या एसबीआय खात्यावरून १५ एप्रिलला एटीएमद्वारे २५ हजार रुपये काढण्यात आल्याचे, तसेच त्यांच्या गहाळ झालेल्या एका धनादेशाद्वारे दोन लाख तीन हजार रुपये महादू वाळकोळी नामक व्‍यक्‍तीच्या बँक खात्यामध्ये वर्ग झाल्याचे दिसून आले.

महादू वाळकोळी हा अशोक मोहिते राहत असलेल्या इमारतीमध्येच भाडेतत्त्‍वावर राहत होता. अशोक मोहिते हे बेपत्ता झाल्यापासून महादू वाळकोळी हादेखील दिसून येत नव्हता. तसेच महादेव याने स्वतःवर संशय येऊ नये म्हणून इमारतीच्या वॉचमनकडे व मोहिते यांच्या मुलाकडेही विचारणा केली होती. त्याचे हे वागणे संशयास्पद वाटल्याने त्यानेच मोहिते यांचे अपहरण केल्याचा संशय आल्याने, त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
-------------------------------
१२ तासांच्‍या आत संशयित ताब्‍यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर महादू वाळकोळी याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय माहितीद्वारे शोध घेऊन १२ तासांच्या आत दुधनोली, ता. मुरबाड येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी खुनाचाही गुन्हा दाखल करून महादूचा साथीदार लक्ष्मण जाधव (वय ५५) यालाही अटक करण्यात आली. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावणार! १४-१५ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना फटका

स्मार्ट माहिती : सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी

Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

आजचे राशिभविष्य - १४ सप्टेंबर २०२६

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

SCROLL FOR NEXT