मुंबई

भूमिपूजन सोहळ्यात वातानुकूलित मंडप

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान शानदार वातानुकूलित मंडप, शक्तिवर्धक पेय (ओआरएस) आणि नाश्ता अशी चोख व्यवस्था करण्यात आली होती. तसेच एक हजार आसनांची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. खारघर दुर्घटनेवरून राज्य सरकारने ही खबरदारी घेतली असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारच्या कारभारावर चौफेर टीका होत होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र शनिवारी ठाण्यात शासकीय कार्यक्रमात दिसून आले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा अक्षय्‍य तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी झाला. या सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींसह, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, विठ्ठल सायन्ना यांचे कुटुंबिय आणि नागरिक उपस्थित होते. या मंडपात एक हजार नागरिक उपस्थित असले तरी त्यांना उन्हाची झळ बसू नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली होती. त्याचबरोबर ओआरएस पावडर, पाणी बाटली आणि नाश्ता अशीही व्यवस्था करण्यात आलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT