मुंबई

आग लागलेल्या रेल्वेतून प्रवाशांची सुटका

CD

मुंबई, ता. २२ : रेल्वे अपघात, आगीच्या घटना, रेल्वेपूल कोसळल्यास सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करावी, याबाबत मध्य रेल्वे दर वर्षी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असते. त्यानुसार शनिवारी (ता. २२) मध्य रेल्वेने इगतपुरी यार्डमध्ये एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत संयुक्तरीत्या मॉकड्रिल केले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी यार्ड येथे सकाळी ११.२७ वाजता मॉकड्रिल सुरू केले. त्यानुसार लगेच एका कोचला आग लागली. ११.२८ वाजता मुंबई विभागाचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले. त्यानुसार एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला आणि सर्व संबंधितांना संदेश देण्यात आला आणि ११.३६ वाजता पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. आग लागलेल्या कोचमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सदर कोच वरून आणि खिडक्यांमधून कापण्यात आले आणि एनडीआरएफचे पथक आतमध्ये शिरले. अग्निशमन दल, आरपीएफ यांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या कवायतीमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सीसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

Varandha Ghat Closed : पुणे-रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; 'या' तारखेपर्यंत वरंध घाट राहणार बंद! जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT