मुंबई

बनावट विम्याच्या माध्यमातून बँकेची फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : जीवन विम्याच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन प्रभादेवी येथील पंजाब ॲण्ड सिंध बँकेची एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँक शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी विमा दलाल व कर्ज घेणाऱ्या एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

आरोपींनी संगनमत करून शाखा व्यवस्थापकाचा विश्वास संपादन केला आणि कर्जधारकांचे बँकेत खाते उघडले. त्यानंतर बनावट विम्याची कागदपत्रे तारण ठेवून ती खरी असल्याचे भासवले. त्या विम्याच्या माध्यमातून आरोपींनी एक कोटी ३२ लाख ३३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. आरोपींनी कर्जाचा पहिला हप्ता भरला व त्यानंतर कोणतीही रक्कम भरली नाही. त्यामुळे बँकेची फसवणूक करून नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या प्रभादेवी शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक राघव रंजन यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी विमा दलाल राणी दुराईराज, सोनाली बोरले व कर्जधारक वैशाली शिगवण, मनीष जैस्वाल, दीपक दाणी, रंजन प्रसाद व प्रकाश बेट यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट कागदपत्रांचा आधार
एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत आरोपींनी पाच कर्जे घेतली. हप्ता न भरल्यामुळे तारण ठेवण्यात आलेल्या विम्याच्या कागदपत्रांची पाहणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रभादेवी शाखेतील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले. पथकाने केलेल्या चौकशीत कर्जासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकने याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली; पण गुन्ह्याची रक्कम १० कोटींपेक्षा कमी असल्यामुळे या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT