मुंबई

जन्मजात दुर्मिळ डिपवेनथ्रोम्बोसिस आजारावर मात

CD

विरार, ता. २६ (बातमीदार) : डिपवेन थ्रोम्बोसिसया विकाराने पिडीत एका ५९ वर्षीय महिलेवर मिरारोड येथील वॉक्हार्ट रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या आजारामुळे महिलेच्या डाव्या पायाला मोठी सूज आली होती. आता महिलेची प्रकृती उत्तम असून तिला घरी सोडण्यात आले आहे. मिरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

विरारमध्ये राहणाऱ्या वंदना देसाई (नाव बदललेले) यांना पायात असह्य वेदना जाणवत होत्या. पायाला सूज असल्याने त्यांना चालताही येत नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय चाचणी केली असता त्यात डिपवेनथ्रोम्बोसिस असल्याचे निदान झाले. डिपवेनथ्रोम्बोसिस या आजारात पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. ही समस्या संसर्ग व जळजळ किंवा इतर कारणांमुळे होऊ शकते. शिवाय शस्त्रक्रिया, दुखापत, गर्भधारणा, हार्मोनथेरपी, कर्करोग आणि काही अनुवांशिक किंवा शारीरिक विकार यांचा समावेश होतो. डिपवेनथ्रोम्बोसिसच्या लक्षणांमध्ये प्रभावित भागात वेदना, सूज, उबदारपणा आणि लालसरपणा यांचा समावेश होतो. काही लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.

=======
रुग्णाच्या पायाची सूज डाव्या मांडीपर्यंत वाढली होती. इकोकार्डियोग्राफी हे सौम्य पल्मोनरी हायपरटेन्शनसह हृदयाचे सामान्य कार्य सूचित करते. शस्त्रक्रियेनंतर पुढील तीन दिवसांत डाव्या खालच्या अंगावरील सूज ५० टक्क्यांपेक्षा जास्त दूर झाली आणि रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या सुधारित स्थितीत ओरल अँटीकोग्युलेशन आणि सपोर्टिव थेरपीने घरी सोडण्यात आले.
- डॉ. आशिष मिश्रा, सल्लागार इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, वॉक्हार्ट रुग्णालय

========
माझ्या पायाला सूज आली होती. ज्यामुळे मला चालणे, उभे राहणे किंवा बसणेदेखील कठीण होत होते. दैनंदिन कामे करण्यासाठीही कुटुंबीयांवर अवलंबून रहावे लागत होते. शीरांशी संबंधित दुर्मिळ जन्मजात शारीरिक विकार असल्याचे निदान झाल्यावर मी घाबरून गेले होते. पण वेळीच व्होकार्डच्या डॉक्टरांनी निदान व उपचार केल्यामुळे आता मी ठीक झाली असून माझी दैनंदिन कामे करू लागली आहे.
- रुग्ण, विरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT