मुंबई

पालघर जिल्ह्यात वाहने चोरणाऱ्यांना भिवंडीत अटक

CD

भिवंडी, ता.२८ (बातमीदार) : शहरात राहून पालघर जिल्ह्यातून वाहने चोरी करणाऱ्या चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. श्रीकांत बाळू बागरवार (वय २७, रा. गोरसई), निशांत मंगेश हुकमाळी (वय २३, रा. धोंडावडवली) अशी अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७ गुन्ह्यांमधील ३ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ६ रिक्षांसह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे, तर त्यांच्या एका साथीदाराचा शोध गुन्हे शाखेचे पोलिस पथक घेत आहे.
नारपोली पोलिस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या घटनेचा समांतर तपास गुन्हे शाखा- घटक २ पोलिस पथक करत होते. दरम्यान, या वाहन चोरीच्या घटनेतील गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन चोरटे शहरातील वंजारपट्टी नाक्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक करत त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. त्यानंतर अधिक चौकशीत त्यांनी सहा रिक्षा चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चोरट्यांनी त्यांचा अन्य एक साथीदार आकाश जयवंत पाटील (रा.वसई, पूर्व) याच्या सोबतीने वसई परिसरामध्ये रिक्षांची चोरी केल्याची कबुली दिली. आकाशवर पेल्हार आणि वालीव पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल असून गुन्हे शाखेचे पोलिस पथक त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT