मुंबई

मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : राज्य परिवहन महामंडळात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यानंतर मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ‘मुंबई १’ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांगांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी ही सवलत मिळणार आहे.

‘ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे; तर महिलांनाही एसटी बसमधून ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून, मेट्रो प्रवासातील सवलतीमुळेही अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील,’ अशी मला आशा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यांना मिळणार सवलत
मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलतीची सुविधा ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इयत्ता १२ वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग व्यक्तींसाठी आहे. या ३ श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी, वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन कार्डसह (विद्यार्थी किंवा पालक पॅन) शाळा ओळखपत्र यांसारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

अशी मिळेल सवलत
१) मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ च्या स्थानकावरील तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्रे दिल्यावर सुविधा मिळू शकेल.
२) नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई- १ कार्डवरही सवलत असेल. तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील.
३) मुंबई १ कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यानदेखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT