मुंबई

ख्रिस गेल शूटिंग प्रकरणात अधिकाऱ्यांची चुप्पी!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ख्रिस गेलने मुंबईच्या समुद्रात जाऊन बेकायदा चित्रीकरण केल्याच्या घटनेला दोन दिवस उजाडले आहेत; मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी अजूनही काहीच बोलायला तयार नाहीत. पैसे घेऊन मुंबईच्या समुद्रात बेकायदेशीर शूटिंग करणाऱ्या रॅकेटला वाचवण्याचे प्रयत्न या निमित्ताने सुरू असल्याची चर्चा आहे.

समुद्रात चित्रीकरणासाठी संबंधित विभागांची परवानगी घ्यावी लागते. परदेशी नागरिकाकडून अर्ज आल्यास पासपोर्टची काटेकोरपणे तपासणी केली जाते. या प्रक्रियेतून सुटका करण्यासाठी काही स्थानिक अधिकाऱ्यांना आणि दलालांना हाताशी धरून ख्रिस गेल समुद्रात गेल्याची माहिती एका अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला दिली आहे. मुंबईच्या समुद्रात अनेक चित्रपटांचे बेकायदेशीर चित्रीकरण सुरू आहे. त्यातून मुंबई पोर्ट ट्रस्टचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, सागरी सुरक्षाही धोक्यात आली आहे.

मुंबईतील समुद्रातील साधारण १२ तासांच्या चित्रीकरणासाठी दोन लाख रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी धरून मुंबई पोर्ट ट्रस्ट २ लाख ३८ हजार रुपयांचे शुल्क प्रोडक्शन हाऊसकडून घेते. त्यानंतर चित्रीकरणाला परवानगी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT