मुंबई

एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० वाजण्‍याच्या सुमारास बिघाड झाला होता. परिणामी, जलद मार्गावरील मेल-एक्स्प्रेससह जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले. कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० वाजण्‍याच्या सुमारास बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच, इतर लोकल इच्छित स्थानकात ३० ते ४५ मिनिटे उशिराने पोहचत होत्या. अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गर्दी जमली होती. दरम्यान, रात्री साडे दहा वाजण्‍याच्या सुमारास रिकामी वातानुकूलित लोकल मार्गावरून हटवून कारशेडमध्ये नेण्यात आली. तसेच जलद मार्गावरील लोकल सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, जलद मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास खोळंबल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. या दरम्‍यान कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT