मुंबई

रेल्वे टीसींशी वाद घालणे पडणार महागात !

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : रेल्वेचे तिकीट तपासनीस आणि फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये वाद होण्याचा घटना वाढत आहेत. या वादावादीचे रूपांतर मोठ्या भांडणात होत असून टीसीला मारहाणीच्या घटना घडत आहे. त्यामुळे आता रेल्वेने तिकीट तपासनिसांची सुरक्षा वाढवण्यासाठी टीसीच्या कपड्यावर बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यात होणारे वाद रेकॉर्ड होणार आहे.

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने वर्षभरात ४६.३२ लाख फुट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून ३०० कोटींहून अधिक कमाईसह मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असली, तरी मध्य रेल्वेच्या या कारवाई अनेकदा प्रवाशांकडून टीसीला मारहाणीच्या घटना घडल्या आहे. अनेकदा कारवाईदरम्यान प्रवाशी टीसीशी वाद, हुज्जत घालतात. बऱ्याचदा या वादा-वादीचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. यामध्ये टीसीला मारहाणदेखील होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने टीसींच्या सुरक्षेसाठी बॉडी कॅमेराचा पर्याय शोधून काढला आहे.


----
पहिल्या टप्प्यात ५० टीसींना बॉडी कॅमेरा
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात साधारणतः १२०० टीसी आहेत. या सर्वांना बॉडी कॅमेरे टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात त्यापैकी ५० टीसींना बॉडी कॅमेरा देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व टीसींना बॉडी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा बॉडी कॅमेरा कार्यरत असलेले टीसी आपल्या शर्ट किंवा कोटच्या खिशाजवळ लावतील. या कॅमेऱ्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होईल. ते जवळपास महिनाभर साठवून ठेवण्यात येईल. त्यामुळे तिकीट तपासणीमध्ये काही विसंगती आढळल्यास किंवा प्रवाशांच्या तक्रारी असल्यास वरिष्ठ अधिकारी त्या व्हिडीओद्वारे प्रकरणाची चौकशी करण्यास मदत होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Geopolitics and International Relations : तुमच्या खिशातील पैशांचा जागतिक युद्धाशी काय संबंध? जाणून घ्या 'भू-राजकारणा'चा तुमच्यावर होणारा परिणाम!

Travels in India by Jean-Baptiste Tavernier : १७ वर्षांची तपश्चर्या आणि हिऱ्यांच्या खाणींचा थरार; फ्रेंच प्रवासी तावर्नियेच्या भारतवारीचा 'मराठी' दस्तऐवज!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 जानेवारी 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (११ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६)

Museum book by Sanjay Dabke : जगभरातील संग्रहालयांचा अनोखा शब्दवेध

SCROLL FOR NEXT