मुंबई

मरगळी तलाव रस्ता विकसित करण्याची मागणी

CD

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : उत्तन परिसरातील चवळी भागात असलेल्या मरगळी तलावालगतचा विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या परिसरात शेती, तसेच प्रार्थनास्थळ असल्यामुळे हा रस्ता विकसित केल्यास त्याचा मोठा लाभ होणार आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त दिलीप ढोले यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

उत्तन-गोराई रस्त्यालगत चवळी येथे सुमारे शंभर वर्षे जुना मरगळी तलाव आहे. या परिसरात शेती असून तलावाचे पाणी शेती आणि बागांसाठी वापरण्यात येते. तसेच संत अंथोनी समाजमंदिरातही त्यांचे जाणे-येणे सुरू असते. मात्र तलावालगत असलेली सरकारी जमीन काही वर्षांपूर्वी ज्युडीशियल अकादमीला देण्यात आली. त्याठिकाणी न्यायाधीशांसाठी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे तलाव व समाजमंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना शेती आणि समाजमंदिराकडे जाण्यासाठी फार मोठा वळसा घालून जावे लागते.

मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मरगळी तलावाच्या पूर्व किनाऱ्यावर नियोजित रस्ता दर्शवण्यात आला आहे. हा रस्ता महापालिकेने विकसित करून दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा, धारावी बेटाचे डीन फादर पीटर डिकुन्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त दिलीप ढोले यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात पावसाला सुरुवात, कचऱ्याला आग

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

SCROLL FOR NEXT