मुंबई

सायन-पनवेल महामार्गावर धोका

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : नवी मुंबईतून जाणाऱ्या तीन प्रमुख महामार्गांपैकी सायन-पनवेल महामार्गावर २०२२ मध्ये सर्वाधिक ५२ अपघातांची नोंद झाली असून या अपघातांत २४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल ठाणे-बेलापूर मार्गावर ३९ अपघात होऊन त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पामबीच मार्गावर झालेल्या १९ अपघातांत चार जणांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.
सायन-पनवेल मार्गावर प्रत्येक बाजूला तीन लेनसह एकूण सहा लेन आहेत. मात्र सहा लेन असलेल्या या टोलनाक्यावर तीन लेनपर्यंत अरुंद झाल्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढते. या मार्गावरून डंपर, बस व इतर अवजड वाहनांची प्रचंड वाहतूक असल्याने वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या लहान वाहनांना धोका निर्माण होतो. भरधाव वेग आणि दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. वाशी टोल नाका आणि वाशी खाडी पूल या दोन ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते. शिवाय, नवीन पुलाचे सुरू असलेले बांधकाम हे या मार्गावरील समस्यांमध्ये आणखी भर घालत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका आणि वाशी खाडी पूल हे दोन प्रमुख ब्लॅक स्पॉट आहेत.
----------------------------------
मुख्य कारण- अतिवेग
पामबीच रस्त्यावर मोरज सर्कल, सारसोळे सिग्नल आणि अक्षर सिग्नलवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. पामबीच मार्गावरून जाणारे बहुतेक वाहनचालक हे शंभर किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे जंक्शनच्या पुढे सिग्नलवर ही वाहने इतर वाहनांना धडकून अपघात होत असतात. अतिवेगामुळे चारचाकी वाहनचालक वाहनावरील नियंत्रण गमावत असल्याने इतरांचाही जीव धोक्यात घालतात.
--------------------------------------------------
पामबीच मार्गावर कमी अपघात
२०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये पामबीच मार्गावर कमी अपघातांची नोंद झाली आहे. २०२१ मध्ये पामबीच मार्गावर एकूण २२ अपघात झाले होते. सायन-पनवेल महामार्गावर ४६, तर ठाणे-बेलापूर मार्गावर ३६ अपघात झाले होते.
--------------------------------------------
प्राणघातक अपघात -२८५
झालेले मृत्यू -२९८
गंभीर जखमी - ४५१
किरकोळ जखमी - १०९
दुखापत झालेली नाही - ३१
एकूण अपघातांची नोंद - ७३४
------------------------------------------
वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेकडून नवीन सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. स्वयंचलित असलेल्या या सीसी टीव्हीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईस मदत होणार आहे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT