मुंबई

मुरबाडमध्ये १३०फूट उंच राष्ट्रध्वजाचे अनावरण

CD

मुरबाड, ता. १ (बातमीदार) : मुरबाड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून शोभणारा १३० फूट उंच राष्ट्रध्वजाचे अनावरण सोमवारी (१ मे) आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकत असताना पोलिसांनी सलामी दिली आणि राष्ट्रगीत संपताच उपस्थित नागरिकांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
मुरबाड शहराच्या तीन हात नाका येथे हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. के फ्लॅग फाऊंडेशनचे राकेश बक्षी, मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता कैलास पतंगराव यांनी या स्तंभ उभारणीसाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राम दुधाळे यांनी केले. यावेळी १०३ वर्षाचे वयोवृद्ध नागरिक पांडुरंग विशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी महाराष्ट्रात कोणत्याही नगर पंचायत हद्दीत एवढा मोठा ध्वजस्तंभ उभारण्यात आला नाही, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी नगर पंचायतीचे नगरसेवक, भाजप कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
मुरबाड : शहरातील तीन हात नाका येथे १३० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT