मुंबई

घणसोलीत आरोग्य सुविधांचा अभाव

CD

घणसोली, ता. १ (बातमीदार) : घणसोली विभागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी आरोग्य सुविधांमध्ये कमतरता भासत आहे. घणसोली विभागात केवळ एकच नागरिक आरोग्य केंद्र आहे. तेही घणसोली गावात असल्याने सेक्टरमधील नागरिकांना महापालिकेच्या सोईंपासून वंचित राहावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी घणसोली विभागातील नागरिक विभागात रुग्णालयाची मागणी करत आहेत.
घणसोली विभागाची लोकसंख्या सद्यस्थितीत पाच ते आठ लाखांहून अधिक आहे. मात्र, या नागरिकांना घणसोली विभागात केवळ एकच नागरी आरोग्य केंद्र आहे. तेही गावात असल्याने सेक्टरमधील नागरिकांना तेथे जाणे शक्य होत नाही. घणसोली गावात गावदेवी मंदिरासमोरही काही वर्षांपूर्वी नागरिक आरोग्य केंद्र सुरू होते; मात्र तेही बंद केल्याने घणसोली विभागातील नागरिकांना महापालिकेमार्फत येणाऱ्या आरोग्याविषयी सोयी-सुविधांबाबत माहिती मिळणे बंद झाली. लाखोंच्या घरात असलेल्या लोकसंख्येला पुरेसे असे आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना आरोग्याविषयी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घणसोली विभागातील नागरिकांना आजारी पडल्यावर ऐरोली आणि वाशी येथील रुग्णालयात पळावे लागते. लोकसंख्येची वाढ पाहता विभागात नेरूळ, वाशी, ऐरोलीप्रमाणे प्रशस्त रुग्णालय असणे गरजेचे आहे. जेणेकरून घणसोली, कोपरखैरणे या विभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी मागणी नागरिक करत आहेत.

आरोग्य केंद्र उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत
सेक्टरमधील नागरिकांना हव्या तशा सुविधा मिळत नसल्याने महापालिकेने सेक्टर ४ या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राची बांधणी केली आहे. मात्र, कित्येक वर्षांपासून हे नागरी आरोग्य केंद्र उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्याने हे आरोग्य केंद्र अद्याप सुरू नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

घणसोली विभागात एका बाजूला खाडी, तर दुसऱ्या बाजूला नाला असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दिवसेंदिवस उद्‍भवत आहेत. अशा वेळेस घणसोली आणि कोपरखैरणे विभागासाठी स्वतंत्र रुग्णालय असणे गरजेचे आहे. या वसाहतीसाठी महापालिकेने भूखंड क्रमांक ३ वर रुग्णालयाची बांधणी करावी.
- दीपाली सुरेश सकपाळ, माजी नगरसेविका

घणसोली विभागात सद्यस्थिती एक नागरी आरोग्य केंद्र आहे. सेक्टर ४ येथील नागरी आरोग्य केंद्र कर्मचारी नसल्याने सुरू करण्यात आलेले नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर आरोग्य केंद्र सुरू होईल.
- वैशाली म्हात्रे, आरोग्य अधिकारी, घणसोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT