मुंबई

१८व्या वर्षी कळणार कर्करोग

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : आनुवंशिक दुर्मिळ कर्करोगाचा धोका किती याचे निदान होणे आता सहज शक्य आहे. प्रोएक्टिव्ह आनुवंशिक चाचणीमुळे आता १८ वर्षांवरील लोकांना कर्करोग आहे की नाही हे कळण्यास मदत होणार आहे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयानंतर आता उपनगरातील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ही चाचणी आनुवंशिक कर्करोग क्लिनिकमध्ये उपलब्ध असेल. याबाबतची घोषणा रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अनिल अंबानी यांनी रविवारी केली.
देशातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी १० टक्के कर्करोग आनुवंशिक म्हणजेच जेनेटिक कर्करोगाचे आहेत; तर ९० टक्के कर्करोग हे व्यक्‍तीच्या बदललेल्या जीवनशैलीतून तयार होतात. रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री यांनी सांगितले, सर्वच लोकांना जनुकीय कर्करोग होत नाही हे खरे आहे. त्यामुळे आनुवंशिक कर्करोग दुर्मिळ कर्करोगाचा प्रकार आहे. तरीही अशा व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो. भूतकाळात कर्करोग झालेल्या किंवा सद्यस्थितीत कर्करोग झालेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या आनुवंशिक कर्करोगाच्या धोक्याची चाचणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. आता रुग्णालयातील आनुवंशिक कर्करोग क्लिनिकमध्ये हा धोका ओळखता येणार आहे. या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला हे कर्करोगाचे उत्परिवर्तन वारशापासून मिळाले आहे की नाही, हे शोधता येते.
...
समुपदेशनाची वाढती गरज
मॉलिक्युलर पॅथॉलॉजीच्या सल्लागार डॉ. अमृत कौर यांनी सांगितले, कर्करोगासंबंधी कोणतीही गोष्ट चिंतेने भरलेली असते. त्यामुळे या चाचण्या करण्यापूर्वी लोकांचे समुपदेशन केले जाते. चाचणीचा अहवाल चिंतेचे कारण बनणार असेल तर ते टाळण्यासाठी त्यांना कोणती उपाययोजना करावी लागेल हे ठरवण्यासाठी समुपदेशन चालू ठेवले जाते. त्यांनी सांगितले की, निगेटिव्ह जीनचे परिणाम सर्व चिंता संपवतात. चाचणीमध्ये ओळखल्या गेलेल्या उत्परिवर्तनाच्या प्रकारावर अवलंबून ऑन्कोलॉजिस्ट धोका कमी करण्यासाठी विविध पर्याय लिहून देतात.
...
महिनाभरात चाचणी अहवाल
जनुकीय चाचणीच्या मदतीने महिनाभरात कर्करोगाचा धोका किती आहे हे कळते, असे डॉ. कौर यांनी सांगितले. या आनुवंशिक चाचणीमध्ये सुमारे १३० जनुकांविषयी माहिती मिळणे शक्य आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या जनुकापासून ते फुप्फुसाच्या कर्करोगाच्या जनुकापर्यंतची माहिती या चाचणीद्वारे मिळू शकते.
...
दरवर्षी १.४ मिलियन नवे रुग्ण
भारतात दरवर्षी कर्करोगाच्या जवळपास १.४ मिलियन नवीन केसचे निदान केले जाते. कर्करोगावरील उपचारांच्या प्रभावामध्ये सुधारणा घडवून आणून या आजाराचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करण्याची क्षमता प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आहे. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्या साह्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात. हा आजार होण्याची शक्यता आहे अथवा नाही, हे कर्करोगाची लक्षणे दिसून येण्याच्याही आधी समजून येऊ शकते. कर्करोगासाठी उपचार धोरणे विकसित करण्यात हे खूप उपयुक्त आहे.
...
जेनेटिक टेस्टिंग महत्त्वाचे का?
कर्करोगासाठी जेनेटिक चाचणीमुळे जेनेटिकमधील विशिष्ट बदल ओळखून व्यक्तीला आयुष्यभरात कर्करोग होईल की नाही याचे अनुमान लावण्यात मदत मिळते. पूर्वनिदान केले जाऊ शकते, व्यवस्थापन करता येते, जोखीम कमी करता येते, टार्गेटेड थेरपी वापरता येते आणि कुटुंबातील इतर सदस्यांना किती धोका आहे हे देखील समजून घेता येते.
...
आनुवंशिक कर्करोग कोणते?
काही कर्करोग हे जेनेटिक असतात आणि त्यामधील म्युटेशन्स कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये पसरतात. जीन्समध्ये पॉझिटिव्ह रूपे असलेल्या व्यक्तींमध्ये आनुवंशिक कर्करोग सिंड्रोम असू शकतो आणि त्यांना काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. स्तन, अंडाशय, मोठे आतडे, स्वादुपिंड, मेलेनोमा आणि इतर काही
प्रकारचे कर्करोग आनुवंशिक कर्करोग सिंड्रोम्सशी संबंधित असतात.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT