मुंबई

मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुंबईत आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्कवर ध्वजवंदन केले; तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. विविध राजकीय पक्ष, आस्थापना, संस्था, संघटनांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध कामगार संघटनांनी आपापल्या कार्यालयांमध्ये कामगार दिन साजरा केला. कामगार मेळावे, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईत विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी विधायक कामांना वेग देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. या वेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल त्यांच्यासमवेत होते. विधान भवनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ध्वजवंदन केले. मुंबईतील सामाजिक संस्था, संघटना, आस्थापना, गृहनिर्माण संस्था यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. कामगार संघटनांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असे संयुक्त कार्यक्रम साजरे केले. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या पोलिस परेडच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आले होते.
...
वांद्र्यात उत्तर भारतीयांचा महाराष्ट्र दिन
उत्तर भारतीय संघाने महाराष्ट्र दिन वांद्रे येथे साजरा केला. पारंपरिक वेषभूषेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या वेळी ३० दिव्यांगांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटपही उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
...
शिवाजी पार्कवर पोलिस परेड
शिवाजी पार्कवर पोलिस दलाकडून पथसंचलन करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनीही जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन केले.
...
शिवराज्य महोत्सव करणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे या वर्षी ३५० वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर २ ते ९ जून या काळात शिवराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार, अशी माहिती बैस यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येईल. तसेच पुण्यातील आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी घोषणादेखील बैस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT