मुंबई

वीज ग्राहकांची दोन हजार प्रकरणे निकाली

CD

कल्याण, ता. २ (बातमीदार) : तालुकास्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी एक हजार ९३० प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी दोन कोटी १५ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलल्या तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार एक हजार ९३० प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली. त्यातून दोन कोटी १५ रुपयांची वसूली झाली. कल्याण मंडल एकअंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ४४० ग्राहकांनी ४८ लाख ९७ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला.
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, उपविधी अधिकारी दीपक जाधव, सहायक विधी अधिकारी सुहास बाराहाते, राजीव वामन व शिल्पा हन्नावार यांनी विशेष प्रयत्न केले.

-------------------------
पालघर, वसई मंडलांतर्गत वसुली
कल्याण मंडल दोनअंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील ८२ लाख ६४ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या ९४६ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील १६६ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ५६ लाख ५ हजार रुपयांचा भरणा केला. पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ३७८ ग्राहकांनी २७ लाख ४६ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT