मुंबई

कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर डॅाक्टरांमुळे हसू

CD

खारघर, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खारघर डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी पनवेल शांतिवन नेरे येथील राजीव रजन आधार आश्रमाला भेट दिली. या वेळी डॅाक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रातील रुग्णांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आश्रमातील सदस्यांचा चेहऱ्यावर हास्य फुलवले.
खारघर डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पनवेल शांतिवन येथील राजीव रजन आधार आश्रमात कुष्ठरोगींची सेवा केली जात असल्याचे माहिती मिळताच या सदस्यांनी आगळावेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा संकल्प केला होता. या वेळी आश्रमाला भेट देऊन या रुग्णांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी काही डॉक्टरांनी नृत्य गायन, वाद्यांसह गीतांचे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. तसेच कुष्ठरोग पुनर्वसन केंद्राला भेट देऊन एक लाख अकरा हजार एकशे सोळा रुपयांसह पाचशे किलो धान्य भेट दिले.
----------------------------------------------
अठरा वर्षांपासून खारघर डॅाक्टर्स असोसिएशन गरजू रुग्णांना मदत करत आहे. सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत सुपर स्पेशालिटी तपासणी, वैद्यकीय शिबिरांमधून विविध आजारांविषयी जनजागृती करीत आहे. याच अनुषंगाने यंदाचा महाराष्ट्र दिन शांतिवन येथील आश्रमामध्ये साजरा केला आहे.
- डॉ. हिमांगा गुप्ता, अध्यक्ष, खारघर डॅाक्टर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT