मुंबई

अनुकंपा भरती हे जिल्हा परिषदेचे यशस्वी पाऊल

CD

पालघर, ता. २ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात ७५ हजार नोकऱ्या देऊन व्यवस्थेमध्ये प्रलंबित असलेल्या नोकऱ्या त्वरित कशा देता येतील, याबाबत अंमलबजावणी करण्याचा विडा उचलला आहे. त्या अनुषंगाने अनुकंपा तत्त्वावरील भरती करून पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने यशस्वी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
सोमवारी (ता. १) महाराष्ट्र दिनी पालघर जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक, आदर्श ग्रामसेवक, स्मार्ट ग्राम या पुरस्काराचे वितरण तसेच अनुकंपा तत्त्वावरील भरतीचे नेमणूक आदेश वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद पालघर सर्वसाधारण समिती सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, सर्व समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कारार्थी शिक्षकांनी राष्ट्राला समर्पित भावनेतून घडवणारे नागरिक तयार केले पाहिजेत. तसेच गावातील सामाजिक व राजकीय परिस्थिती यांचा समतोल साधणे, गाव तंटामुक्त करणे, गावामध्ये सलोखा कसा निर्माण करता येईल; तसेच गावातील कामकाज एकत्रितदृष्ट्या कसे चालवले जाईल, यासाठी काम करणाऱ्या ग्रामपंचायती सर्वच स्मार्ट ग्राम आहेत, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित व माजी आमदार रवींद्र फाटक यांनीही सर्व पुरस्कार्थीना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

--------------------------
कार्यक्रमामध्ये गोंधळ
पुरस्कार कार्यक्रमांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने पुरस्कार स्वीकारण्याच्या ठिकाणी गर्दी झाल्याने एका ठिकाणी पालकमंत्री, एका ठिकाणी खासदार व एका ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरस्कार देत असल्याने कोणकोणाला पुरस्कार देतो, हेच कळत नव्हते. या वेळी ९० गुणवंतांना पुरस्कार देण्यात आले. त्यामुळे गोंधळ उडाला होता. गौरवण्यात आलेल्या गुणवंत पुरस्कारार्थींनी मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT