मुंबई

मिरा-भाईंदरमध्ये १४ इमारती धोकादायक

CD

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मिरा-भाईंदर परिसरात १४ इमारती धोकादायक असल्याचे महापालिका प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. यातील एक इमारत गेल्या वर्षीच धोकादायक घोषित करण्यात आली होती, परंतु त्यावर न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यामुळे ती तोडण्यात आलेली नाही. धोकादायक इमारती ३१ मेपर्यंत तोडण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त ४१५ इमारतींना दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात एखादी इमारत कोसळण्याची दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून ३० वर्षे जुन्या, तसेच मोडकळीस आलेल्या १,१०८ इमारतींना नोटीस बजावण्यात आली होती. या इमारतींनी महापालिकेने नेमलेल्या अभियंत्यांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर करण्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार इमारतींकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून त्याची छाननी करून इमारतींची वर्गवारी करण्यात आली. त्यात १४ इमारती राहण्यास योग्य नसल्यामुळे त्या धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

या यादीतील १३ इमारती या वर्षी नव्याने धोकादायक घोषित झाल्या आहेत; तर एक इमारत गेल्या वर्षीच धोकादायक घोषित करण्यात आली होती, परंतु महापालिकेने इमारत तोडण्यासंदर्भात बजावलेल्या नोटीसविरोधात रहिवाशांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळवला होता. त्यामुळे गेल्या वर्षी त्या इमारतीवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या इमारतीचा पुन्हा या वर्षीच्या धोकादायक इमारतींमध्ये समावेश करण्यात आला.

३८३ इमारतींची दुरुस्ती आवश्‍यक
इमारतींकडून प्राप्त झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार ४२९ इमारतींची सी-१, सी-२ ए, सी-२ बी व सी-३ अशा चार गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. सी-१ मध्ये समाविष्ट झालेल्या इमारती राहण्यास योग्य नसून त्या तात्काळ पाडायच्या आहेत. सी-२ ए मधील इमारती रिकाम्या करून त्याची दुरुस्ती करायची आहे. सी-२ बी या गटात सर्वाधिक ३८३ इमारती असून त्यांची दुरुस्ती करायची आहे. सी-३ गटामधील इमारतींची किरकोळ दुरुस्ती करवून घ्यायची आहे.

कोट
आयुक्त दिलीप ढोले यांनी काही दिवसांपूर्वी धोकादायक इमारतींसंदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्यांची यादी घोषित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही घोषित करण्यात आली आहे. धोकादायक असलेल्या १४ इमारती ३१ मे पूर्वी तोडण्याची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- मारुती गायकवाड,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

प्रभागानुसार धोकादायक इमारती
प्रभाग एक १
प्रभाग दोन ४
प्रभाग तीन ५
प्रभाग चार ०
प्रभाग पाच ०
प्रभाग सहा ४

धोकादायक गटानुसार इमारती
सी-१ १४
सी-२ ए १९
सी-२ बी ३८३
सी-३ १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT