मुंबई

वादग्रस्त बारवर महापालिकेकडून हातोडा

CD

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : शहराच्या पूर्व परिसरातील वादग्रस्त ठरलेल्या बारवर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने धडक कारवाई केली. या बारमध्ये करण्यात आलेले वाढीव अनधिकृत बांधकाम मंगळवारी (ता. २) उद्ध्वस्त करण्यात आले.

काही वर्षांपूर्वी हा बार अनधिकृत असल्यामुळे महापालिकेने उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर बारमालकाने पुन्हा त्याच ठिकाणी बारचे बांधकाम केल्यामुळे महापालिकेने त्याला अनधिकृत असल्याची नोटीस बजावली होती. त्या नोटीसला बारमालकाने न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता. असे असताना काही दिवसांपूर्वी बारमालकाने महापालिकेकडून दुरुस्ती परवानगी मिळवून बारमध्ये वाढीव बांधकाम केले. न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना बारला दुरुस्ती परवानगी देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर जोरदार टीका केली जात होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने बारमध्ये करण्यात आलेल्या वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई करून ते तोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT