मुंबई

कोविड मृत्यूंत ३.७ टक्क्यांनी वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : सौम्य म्हणून दुर्लक्ष करत असलेल्या एक्सबीबी.१.१६ व्हेरिएंटने धोका दिला आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात वाढलेल्या कोविड मृत्यूचे प्रमुख कारण हाच व्हेरिएंट असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. महिनाभरात ३.७ टक्क्यांनी कोविड मृत्यू वाढल्याने सहव्याधी रुग्णांना इशारा दिला जात आहे. अजूनही बूस्टर डोस घेतला नसल्यास तो पूर्ण करा, असे आवाहन केले जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ मुळे महाराष्ट्रात मार्चमध्ये शून्य मृत्यू नोंदले गेले होते. ही संख्या एप्रिलमध्ये ७३ वर पोहोचली आहे. म्हणजेच ३.७ टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये एकही मृत्यू झाला नव्हता. ओमिक्रॉनचा एक्सबीबी.१.१६ प्रकार आणि रुग्णांना असणाऱ्या सहव्याधी ही कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. लशींमुळे मृत्यूची टक्केवारी कमी होत असल्याने कोविड लस घेण्यास सांगितले जात आहे.
...
राज्यात प्रबळ प्रभाव
एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की महाराष्ट्रातील प्रबळ कोविड प्रकार म्हणजे एक्सबीबी.१.१६ हा स्ट्रेन आहे. या प्रकाराची लागण झालेली १,११२ प्रकरणे आढळून आली. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे मृत्यू जास्त प्रमाणात झाले आहेत. तसेच ८८ टक्के मृत व्यक्तींना सहव्याधी होत्या आणि १३ टक्के जणांना सहव्याधी नसूनही त्यांचा मृत्यू ओढवला होता.
...
सहव्याधीग्रस्त वृद्धांचे मृत्यू
माजी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, की या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात कोविड रुग्ण आणि मृत्यूचे प्रमुख कारण उपप्रकार हे होते, पण बहुतेक प्रकरणे सौम्य ते मध्यम लक्षणांची होती. सहव्याधी असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये प्रामुख्याने मृत्यू झाले आहेत.
...
तज्ज्ञांचा सल्ला
डॉ. आवटे यांनी जे नागरिक पात्र आहेत किंवा त्यांचा कोविड-१९ चा डोस चुकला आहे, त्यांनी त्वरित तो घेण्याचे आवाहन केले. राज्यभरातील उष्णतेच्या लाटेमुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपत्कालीन स्थितीपर्यंत घरीच राहावे आणि गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
...
रुग्ण आणि मृत्यूंमध्ये वाढ
एप्रिल
रुग्ण - २१,१११
मृत्यू - ७३
चाचण्या - ३,५८,०९७
चाचणी सकारात्मक दर (टीपीआर) - ६ टक्के
मृत्युदर - ०.३४ टक्के
...
मार्च
रुग्ण - ६,४४९
मृत्यू - २०
चाचणी - १,८९,२९५
टीपीआर - ३.४० टक्के
मृत्युदर - ०.३१ टक्के
...
फेब्रुवारी
रुग्ण - ४७२
मृत्यू - ०
चाचण्या - १,६६,२५९
टीपीआर - ०.२८ टक्के
मृत्युदर - ०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT