मुंबई

बदलापूर पालिकेत फेरीवाल्यांची धाव

CD

बदलापूर, ता. २ (बातमीदार) : रेल्वे स्थानक आणि बाजार परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांचे हाल होत होते. या प्रकरणी पदपथ मुक्त करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंत कारवाईसाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार शहराच्या पूर्व आणि पश्‍चिम बाजारपेठेतील फेरीवाल्यांना हटवण्यात आले. त्यामुळे बदलापूरच्या पदपथ आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र दुसरीकडे मंगळवारी (ता. २) फेरीवाल्यांनी बदलापूर पालिकेला घेराव घातला.

२ मे रोजी रस्त्यावर उतरणार, अशी ठोक भूमिका मनसेने घेतली होती. त्यानुसार आज शहरातील शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आपला आवाज पालिकेत पोहचला असून, आता फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करत त्यांना पर्यायी जागा द्यावी; अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भूमिका मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी मांडली. दुसरीकडे कारवाई केलेल्या फेरीवाल्यांनी, आम्ही आता जगायचे कसे? मालविक्रीसाठी कर्ज काढून आणतो, त्या वस्तू विकायच्या कशा? पर्यायी जागा देण्याचे आश्‍वासन दिले, मात्र अद्याप जागा दिली नाही, आमचे पोट या व्यवसायावर भरते तर आम्ही करायचे काय? असा सवाल उपस्थित करत फेरीवाल्यांनी पालिकेला घेराव घातला. या प्रकरणी लवकरच विचार करून निर्णय घेऊ, अशी भूमिका मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Latest Marathi News Live Update : कोकणवासियांसाठी मनसे मैदानात

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT