मुंबई

गृहनिर्माण संस्थांची मुंबईत परिषद

CD

मुंबई, ता. २ ः मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत १३ व १४ मे रोजी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दोन दिवसांच्या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक महत्त्‍वाच्या विषयांवर चर्चा होईल.
भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली. या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होईल व काही ठरावही मंजूर होतील. उद्‌घाटनाच्या सत्रात डीम्ड कनव्हेयन्स या विषयावर चर्चा होईल. शासनाने डीम्ड कन्व्हेयन्सची तरतूद केली, परंतु आजही डीम्ड कन्व्हेयन्स होत नाही. यासंदर्भातील अडचणींवर चर्चा होईल आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचेही दरेकर म्हणाले.
स्वयंपुनर्विकास या महत्वाच्या विषयावरही या वेळी सखोल माहितीपूर्ण चर्चा होईल. परिषदेचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल; तर समारोप सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहतील.

गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांबाबत राज्याचे सहकार आयुक्त मार्गदर्शन करतील. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात सहकार सचिव अनुप कुमार, नगरविकास सचिव भूषण गगराणी आदी हजर असतील. सहकार आणि नगरविकास विभागाशी संबंधित विषयांवरही चर्चा होईल. तसेच महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत जमीन हस्तांतरण, एनए टॅक्स आदी विषय चर्चीले जातील.
- प्रवीण दरेकर, आमदार

परिषदेत याही गोष्‍टी
परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध प्रकारच्या स्टॉलचे प्रदर्शन, हौसिंग फेडरेशनची माहिती देणारे स्टॉल, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फ डेव्हलपमेंटचे स्टॉल तसेच या परिषदेशी पूरक असणारे माहितीपूर्ण स्टॉल उभारले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT