मुंबई

बस - कंटेनर अपघातात २३ जखमी

CD

वाडा, ता. २ (बातमीदार) ः वाडा-भिवंडी महामार्गावर कुडूस येथे मंगळवारी (ता. २) सकाळी पावणेनऊ वाजता कंटेनर व बसचा अपघात झाला. यात २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

पालघर आगाराची पालघर-वडूज ही बस आज सकाळच्या सुमारास पुण्याकडे जात होती. कुडूस येथील कोकाकोला कंपनीसमोर समोर ही बस आली असता समोर चालणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस कंटेनरवर जाऊन आदळली. त्यामुळे बसमधील २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कुणाच्या तोंडाला, कुणाच्या नाकाला, डोक्याला असा किरकोळ मार लागला आहे. काही जखमींवर वाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली. दरम्यान, भिवंडी-वाडा मार्गावर अनेक कारखाने असून या कारखान्यात कच्चा व पक्का माल घेऊन जाणारी वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवली जातात. त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT