मुंबई

दीड महिन्यापासून तरूण बेपत्ता

CD

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नेरूळ शिरवणे येथून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी म्हणून निघालेला तरूण दीड महिन्यानंतरही बेपत्ता आहे. १४ मार्च रोजी हा तरुण घरातून बाहेर पडला होता. विजय राजदेव पाल (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. नेरूळ पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे.

विजय पाल हा नेरूळच्या शिरवणे भागात कुटुंबासह राहत होता. त्याचे कुटुंबीय दूध डेअरीचा व्यवसाय करतात. विजयच्या कुटुंबीयांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी पाहिली होती. मुलीला पाहण्यासाठी उत्तर प्रदेशात जाऊन येण्यास विजयला कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार तो १४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी जाण्यास घराबाहेर पडला. मात्र, तो त्याच्या मूळ गावी पोहोचलाच नाही. त्याचा फोनदेखील बंद आहे. कुटुंबीयांनी नवी मुंबई, उत्तर प्रदेश या ठिकाणी त्याची शोधाशोध केली; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे २० मार्च रोजी कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली असून शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Leader Arrested : मोठी बातमी ! राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप; अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवले अन्...

Inspiring Journey: देशाचे नाव उंचाविण्यासाठी आईचे मंगळसूत्र गहाण; दिव्यांग ‘संघर्षकन्या’ भाग्यश्री जाधवच्या नावावर ३४ पदकांची कमाई

Raj Thackeray : राज ठाकरे रायगडावरून करणार सदस्य नोंदणीला सुरुवात; वर्धापन दिनापूर्वी कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश

Women's Day: एका डोळ्याची दृष्टी गेली, तरीही एमपीएससी क्रॅक! उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे यांची प्रेरणादायी कहाणी

Chandrashekhar Bawankule: अमरावतीची पालकमंत्री महिला होणार; ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जागतिक महिला दिनी घोषणा

SCROLL FOR NEXT