मुंबई

अशोक राणे यांना सत्यजित रे पुरस्कार

CD

मुंबई, ता. २ ः ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि लेखक अशोक राणे यांना चित्रपटसृष्टीतील लेखनासाठी सत्यजित रे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. चित्रपटविषयक उत्तमोत्तम लेखन करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा पुरस्कार अरुणा वासुदेव (२०२१) आणि प्रो. शनमुगदास (२०२२) यांना देण्यात आला होता.
गेली ४६ वर्षे अशोक राणे चित्रपटविषयक लेखन करीत आहेत. जागतिक चित्रपटांवर मराठीमध्ये त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंग्रजी भाषेतही त्यांनी लेखन केले आहे. चित्रपट समीक्षा लेखनात त्यांनी स्वतःचा आगळावेगळा ठसा उमटवला आहे. फ्रिस्की इंडियातर्फे सत्यजित रे मेमोरियल पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे. सत्यजित रे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. अशोक राणे यांना पहिल्यांदा १९९५ मध्ये ‘सिनेमाची चित्रकथा’ या पुस्तकाच्या लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २००३ मध्ये सर्वोत्कृष्ट सिने-समीक्षक म्हणून आणि ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर अशोक राणे यांचा गौरव झाला आहे. अशोक राणे यांनी चित्रपट व आठ माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये फ्रिस्की ज्युरीचे सदस्य म्हणून काम केले आहे. राणे यांनी फिल्म सोसायटीच्या चळवळीतही सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT