मुंबई

मुंबई विमानतळ दुरुस्तीसाठी सहा तास बंद

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेच्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवरील दोन्ही धावपट्टींची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल आज करण्यात आली. याकरिता विमानतळावरील सर्व वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दिवसाला सुमारे ८०० हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण असतो. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात आले. यासाठी सर्व विमान वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती. या वेळी धावपट्टी आणि टॅक्सी वेवरील जवळपास पाच हजार एरोनॉटिकल ग्राऊंड लाईट्स सर्व्हिस तपासण्यात आल्या. तसेच विमानांना दिशात्मक मार्गदर्शन करणाऱ्या १ हजार ३०० ग्राऊंड मार्किंग्ज नव्याने रंगवण्यात आल्या. शिवाय धावपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कमी करण्यासाठी दोन हजारहून अधिक नाले साफ करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT