मुंबई

साहेब, निर्णय मागे घ्या..!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : ‘साहेब, निर्णय मागे घ्या, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, हिंदुस्थान का बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार...’ अशा घोषणांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा परिसर दणाणून गेला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर सर्व जण अस्वस्थ झाले होते. पवारसाहेब हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत इथून हटणार नाही, अशा निर्धाराने सर्वांनी प्रतिष्ठानच्या आवारात ठिय्या मांडला होता.

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली. ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईसह राज्यभर पसरली. पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी भरसभागृहातच ठिय्या मांडला. तुम्ही राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या, असे आर्जव नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पवार यांना करीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर अक्षरश: रडले. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. आम्ही राजीनामा देतो; पण आपण राजीनामा देऊ नका, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत होते.

कार्यक्रम संपताच सभागृहातील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर आवारात ठिय्या मांडला. शरद पवार समारंभ आटोपून सभागृहाच्या बाहेर पडले तेव्हा त्यांच्या गाडीच्या पुढे आडवे होण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. ‘निर्णय मागे घ्या, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, हिंदुस्थान का बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार...’ आदी घोषणांनी यशवंतराव चव्हाण सभागृहाचा आवार दुमदुमून गेला. दुपारी २ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी घोषणा देत आवार दणाणून सोडला. जशी बातमी पसरली, तशी प्रतिष्ठानकडे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती.

‘दोन ते तीन दिवस द्या’
संध्याकाळी पाच वाजून ५६ मिनिटांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, रोहित पवार हे नेते ठिय्या मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना सामोरे गेले. शरद पवार यांचा निरोप त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितला. अजित पवार म्हणाले, की आम्ही पवार यांच्याशी ‘सिल्व्हर ओक’वर चर्चा केली. तुमचे म्हणणे आम्ही त्यांच्यासमोर मांडले. मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या, असे शरद पवार म्हणाले आहेत. आपण धरणे मागे घ्या, राजीनामा कोणीही देता कामा नये. नागरिकांना त्रास होईल अशी धरणे, उपोषणे, रास्ता रोको करू नका. तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, त्यांना देशभरातून अनेक नेत्यांचे फोन येत आहेत. विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांना त्यांनी आपलेसे केले आहे. त्यांना दु:ख होईल, असे वर्तन कोणीही करू नये, येथून आता आपापल्या घरी जा, असे आवाहन अजित पवार यांनी करताच कार्यकर्ते हळूहळू तेथून निघू लागले; मात्र तरीही अनेक उशिरापर्यंत कार्यकर्ते प्रतिष्ठानच्या आवारात थांबून होते.

पक्षाला चांगले दिवस येत आहेत. दिवसेंदिवस महाविकास आघाडी मजबूत होत आहे. अशा वेळी पवारसाहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, अशी माझ्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. जोपर्यंत पवारसाहेब आपला निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही.
- प्रकाश गजभिये, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

ना भडक लूक ना अतिशयोक्ती; कतरिना-विकीने साधेपणा नेटकऱ्यांना भावला, Viral Video

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

SCROLL FOR NEXT