मुंबई

पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने विविध टास्क देत बँक खाते रिकामे करणाऱ्या राजस्थानी टोळीचा माटुंगा पोलिस ठाण्यातील सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सुरत सिंग, देवीसिंग, विनोदकुमार अगरवाल अशी तिघांची नावे आहेत. या त्रिकुटाने शेकडो जणांना फसवल्याचा संशय असून, त्यांच्याकडून ३२ मोबाईल आणि ७२ सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या सुकन्या परब (२६) यांनी ६ मार्चला सायंकाळी घरी असताना इन्स्टाग्राम अकाऊंट आणि ॲमेझॉनवर पार्ट टाइम जॉबची बनावट जाहिरात पाहून त्यावर क्लिक केले. त्यानंतर समोरून ॲमेझॉन कंपनीतून बोलत असल्याचे भासवून पार्ट टाइम जॉबबाबत विचारणा केली. सावज जाळ्यात अडकताच, भामट्याने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. पुढे बँक खाते लिंक करण्यास भाग पाडून, वेगवेगळे टास्क देत त्यांचे बँक खाते रिकामे केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुकन्या यांनी पोलिसांत धाव घेतली. माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

सायबर पोलिसांनी तपासात सर्वप्रथम ज्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित झाले, त्या बँक खात्याचे तपशील तपासले. बँकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ट्रॅक करायला सुरुवात केली. पोलिसांना लोकेशन मिळताच सुरत सिंग आणि देवीसिंगला सायन परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांकडे अधिक तपास केला असता विनोदकुमार अगरवालला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT