मुंबई

सुट्टीच्या हंगामात चिमुकल्यांचा हिरमोड

CD

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : सेक्टर २१ मधील उद्यानांमध्ये बसवण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये एक ते दोन उद्याने आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुलांना खेळण्याची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र तुर्भे विभाग याला अपवाद ठरला आहे. तुर्भे परिसरामध्ये तुर्भे गाव, सेक्टर २१ या ठिकाणी २ प्रभाग आहेत. सुमारे ७ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या विभागांत मुलांना खेळण्यांनी एकही सुसज्ज उद्यान नाही. दोन वर्षांपूर्वी सेक्टर २१ मधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर तात्पुरती खेळणी बसवण्यात आली होती. दोन वर्षांपासून या खेळण्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याने दुरुस्तीच्या पलीकडे गेली आहेत. तसेच उद्यानामध्ये बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्यही तुटले आहे. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनीही उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
--------------------------------
अपघात होण्याची शक्यता
उद्यानातील खेळण्याचे साहित्य नादुरुस्त झाले असले तरी लहान मुले या खेळण्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक स्थितीतील खेळण्यांची दुरुस्ती तातडीने करण्याऐवजी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
-------------------------------------
एक वर्षापासून खेळणी दुरुस्तीची फाईल बनवली आहे. लवकरच काम केले जाईल, असे थातूरमातूर उत्तरे दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीच्या नावाने बोंबच आहे.
ृः- कविता पाटील, समाजसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT