मुंबई

मालमत्तेच्या वादातून मायलेकाचे अपहरण

CD

मुंबई, ता. ४ : मालमत्तेच्या लोभापोटी मायलेकाचे अपहरण करून त्यातील मुलाची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना चेंबूर पोलिसांनी अटक केली. मुनीर पठाण, रोहित अदमाने, राजू दरवेश, ज्योती वाघमारे आणि प्रणव रामटेके अशी त्यांची नावे आहेत. ५ एप्रिलपासून हे मायलेक बेपत्ता होते. महिलेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच मुलाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
रोहिणी कांबळे आणि विशाल कांबळे या मायलेकांचे ५ एप्रिलला चेंबूरमधील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले होते. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्टकचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये त्यांना ठेवले होते. रोहिणी यांनी आवाज करू नये, यासाठी त्यांना सतत गुंगीचे औषध दिले जात होते. त्यांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये हत्या करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना आरोपींनी दिली. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT