मुंबई

जांभोरी मैदानात वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाचे सादरीकरण

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. ही मागणी मान्य करून म्हाडाने शुक्रवारी (ता. १२) वरळीतील जांबोरी मैदान येथे सादरीकरण करण्यात आले. या आराखड्यावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच सुधारित आराखड्यात इमारतीच्या मजल्यांची संख्या २२ मजल्यांवरून ४० मजल्यांपर्यंत वाढविण्यात आली. यावर स्थानिकांचा आक्षेप आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हाडाकडे केली होती. यानुसार शुक्रवारी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
या वेळी मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मजल्यांची संख्या वाढविल्यामुळे झालेले फायदे, इमारतींचा आराखडा, सुरक्षा व्यवस्था, अग्निसुरक्षा उपकरणे, उद्याने आणि मनोरंजन साधने याची माहिती म्हाडाने नागरिकांना दिली.
सादरीकरणानंतरही नागरिकांना काही प्रश्न असल्यास पुढील दोन दिवसांत म्हाडाच्या वरळीतील सेंटरवर जमा करावेत, असे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले. प्रश्न येताच नागरिकांच्या या प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही म्हाडाने या वेळी सांगितले.

स्थानिकांचा अधिकारी आणि संदीप देशपांडे यांना घेराव
प्रकल्‍प सादरीकरणानंतर स्थानिक नागरिकांना प्रश्न मांडू न दिल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी उपस्थित असणाऱ्या म्हाडा अधिकारी, मनसे नेते संदीप देशपांडे आणि विभाग पदाधिकारी यांना घेरले. तसेच मजले वाढविणे, पार्किंगची व्यवस्था याबाबत आमचे प्रश्न मांडू का दिले गेले नाही, असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.

स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध नाही. रहिवाशांचा मूळ प्रश्न होता की नेमके काय काय होणार आहे. कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत, हेच लोकांना माहिती नव्हते. हे लोकांना माहीत झाले. आराखडा सादर झाल्यावर पुन्हा बैठकीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. पुन्हा एकदा आता या स्थनिकांच्या मांडलेल्या मागण्या आम्ही राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक घेऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न मनसे करेल.
- संदीप देशपांडे, मनसे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT