मुंबई

बेशिस्त वाहन चालकांचे कल्याण

CD

कल्याण, ता. १५ (बातमीदार) : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अनेक चालक वाहने चालवत आहेत. गेल्या चार महिन्यात अशा २६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तर चार कोटींहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशात नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे या कोंडीत आणखीन भर पडत आहे. त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिमेला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांच्या पथकाने चार महिन्यात धोकादायक वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, हेल्मेट न घालणे, सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर, सिट बेल्ट न लावणे, मोबाईलचा वापर, विना लायसन्स, दुचाकीवर बेकायदा पोलिस आणि पत्रकार स्टिकर लावणे आदी नियम मोडणाऱ्या १४ हजार हून अधिक वाहन चालकांवर गेल्या चार महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. तसेच तीन कोटी ७४ लाख ७ हजार ३०० रुपये दंड म्हणून वसूल केले असून न्यायालयाने वाहन चालकांना सात लाख नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कल्याण पूर्व वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने ही बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई केली आहे. यात १२ हजारहून अधिक जणावर कारवाई केली असून सुमारे ७५ लाख ६८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. तर न्यायालयाने वाहन चालकांना तीन लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
....
कारवाई सुरूच राहणार
वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे याबाबत आम्ही वारंवार जनजागृती करतो. नियम मोडणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करत असून ही कारवाई पुढे सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण पश्चिम वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT