gold esakal
मुंबई

Mumbai : रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत

ती लग्नासाठी तिच्या घरातून कल्याण रोड ते शास्त्रीनगरकडे जात असताना प्रवासात पाच तोळे सोने आणि पाच हजारांची रोकड असलेली बॅग ती रिक्षात विसरली.

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी - भिवंडीतील कल्याण शास्त्रीनगर येथील एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाणारी एक महिला रिक्षात पाच तोळे सोने आणि पाच हजारांची रोकड असलेली बॅग विसरली होती. तक्रार मिळाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन बॅगेतील ऐवजांसह महिलेला विसरलेली बॅग परत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहर पोलिस ठाण्यात १० मे २०२३ रोजी रात्री फिर्यादी शबनम चौधरी यांनी आपल्या हरवलेल्या बॅगेची तक्रार दिली होती. ती लग्नासाठी तिच्या घरातून कल्याण रोड ते शास्त्रीनगरकडे जात असताना प्रवासात पाच तोळे सोने आणि पाच हजारांची रोकड असलेली बॅग ती रिक्षात विसरली.

ही घटना लक्षात येण्याअगोदर रिक्षाचालक तिथून निघून गेला होता. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस हवालदार गौडा यांनी संबंधित भागातील अंमलदार पोलिस नाईक कोळी व सहकारी पोलिस शिपाई गोसावी यांना फोन करून तक्रारीची माहिती देत रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांनी तक्रारदाराकडून माहिती घेऊन ती ज्या रस्त्यावरून जात होती,

त्या रस्त्याचे सीसी टीव्ही फुटेज पाहून, रिक्षाचा फोटो आणि रिक्षाचा क्रमांक काढून रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. रिक्षा मिळाल्यानंतर तक्रारदारासमोर ती बॅग उघडून तपासली असता त्या बॅगेत पाच तोळे सोने व पाच हजारांची रोकड आढळून आली.

ती बॅग पोलिसांनी शबनम चौधरी यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर या महिलेने सुटकेचा नि:श्वास सोडत पोलिसांनी बॅग मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT