मुंबई

‘पुढचं पाऊल’ प्रतिक्रिया

CD

‘पुढचं पाऊल’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितीत राहत असताना प्रत्येक स्त्रीला स्वतःचे अस्तित्व असते. तिला न मिळालेले हक्क हे लढून घ्यायचे असतात. मात्र त्यांना कुणीतरी सहकार्य, मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. ‘सकाळ’ने या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ दिले आहे. अनेकांनी संघर्ष करून वाटचाल केली. त्याचे यशस्वी प्रवासाची यशोगाथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल. निश्चितपणाने प्रत्येक महिला ही स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करते आणि तिला तिचा अधिकार आहे.
- रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
.....
‘सकाळ’ आणि केनेस्टेन यांच्या संयुक्तरीत्या आयोजित ‘पुढचं पाऊल’ या कार्यक्रमाला, गप्पा-गोष्टी चर्चासत्राला येऊन खूप छान वाटले. महिला सक्षमीकरणासाठी अशाच कार्यक्रमाची गरज आहे. ‘महिलांना पुढे नेण्यास मदत करायची’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. याबद्दल ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे आभार.
- झेलम चौबळ, संचालक, केसरी टूर्स
===
या अभिनव कार्यक्रमास उपस्थित राहून खूप छान वाटले आणि अभिमानही वाटला. कर्तबगार महिलांच्या संघर्षाची कहाणी, अनुभव तसेच महिलांसाठी कायदे आणि सर्वांगीण माहिती मिळाली. या कार्यक्रमासाठी राजकीय, कर्तबगार महिला, अभिनेत्री, विविध क्षेत्रातील महिला होत्या. अशा कार्यक्रमांची खरंच गरज आहे.
- डॉ. अलका गोडबोले, स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ
====
आजचा कार्यक्रम खूप छान आणि सुरेख होता. ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र म्हणून नाही, तर एक सामाजिक बांधिलकी जपत आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिलांचे सबलीकरण करू शकता येईल. यातून महिलांना सक्षम होण्यासाठी हिम्मत मिळते. तसेच अशा कर्यक्रमाच्या माध्यमातून महिला व्यक्त होतात. असे कार्यक्रम व्हायला हवे... त्यासाठी माझ्या शुभेच्छा..!
- जुई गडकरी, अभिनेत्री
=====
‘पुढचं पाऊल’ या कार्यक्रमानिमित्त चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली म्हणून ‘सकाळ’चे आभार. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सगळ्याच मान्यवरांनी मार्गदर्शन चांगले केले. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन वाटचाल प्रत्येक क्षेत्रात करीत आहेत. महिलांनीही आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घ्यावी आणि वाटचाल करावी.
- ऊर्मिला कानेटकर, अभिनेत्री
====
खरे तर सर्वप्रथम ‘सकाळ’चे आभार. कारण त्यांनी ‘पुढचं पाऊल’ हा अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आणि त्याचा एक भाग म्हणून मला संधी दिली. आतापर्यंत आपण नेहमीच आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना प्राधान्य देतो; पण महिलांनी आपल्या स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे. ‘पुढचं पाऊल’ या निमित्ताने आपण आपल्या स्वतःच्या स्वप्नांना वाव द्यावा, ज्यामुळे आपण काही तरी साध्य करू शकतो. आता प्रत्येक क्षेत्रात महिलांना आपण मोठ्या पदावर पाहतो. त्यांचाच आदर्श आपण घेऊन चालणे गरजेचे आहे. हेच महिलांचे खरे ‘पुढचं पाऊल’ असेल.
- तन्वी मुंडले, अभिनेत्री
====
‘पुढचं पाऊल’ हा अतिशय उत्तम आणि मार्गदर्शक वेगळा उपक्रम विशेषतः महिलांसाठी ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाने राबविला आहे. खूप छान कार्यक्रम होता. आज नवीन तरुणी काम करतात त्या किती पुढे येऊन काम करतात. त्याची माहिती कळण्यासाठी हा सुंदर कार्यक्रम आहे आणि आम्हालाही अशा कर्तबगार महिलांशी संवाद साधायची संधी मिळते.
- किनीत हजारे, आहारतज्ज्ञ
====
‘पुढचं पाऊल’ कार्यक्रमाचे प्रायोजक ‘सकाळ’ आहे. मी ‘मंत्र इव्हेन्ट’ ही कंपनी मागच्या वर्षी स्थापन केली. मला १४ वर्षांचा अनुभव महिलांच्या क्षेत्रातील इव्हेन्टमध्ये आहे. महिलांसाठी अनेक संस्था, काम करतात. मात्र महिलांची करमणूक करण्यासाठी ‘मी मंत्रा’ कार्यरत आहे. यासोबत आम्ही लघू उद्योग सारख्या कार्यशाळाही चालवितो. सक्षमीकरण आणि महिलांना आनंद देणे, करमणूक देणे हाच उद्देश आहे.
- श्रुती बाविस्कर, संचालक, मी मंत्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT