मुंबई

नालासोपाऱ्यात तिघे सराईत गुन्हेगार अटक

CD

नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : घरफोड्या, वाहनचोरी, जबरी चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात विरारच्या गुन्हे शाखा कक्ष ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाला यश आले आहे. चोरट्यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासह मुंबई, ठाणे परिसरातील १२ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील १५ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
दीपकसिंग ऊर्फ भुसिसिंग राजूसिंग टाक (वय ३९), फहिब अब्बास भुरे, दिनेश अनंता भोईर असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. हे तिघेही भिवंडीच्या विविध भागांतील राहणारे आहेत. दीपकसिंग हा सराईत गुन्हेगार असून नालासोपारा, विरार, तुळिंज, रबाले, डोंबिवली, कळवा या पोलिस ठाण्यातील १० गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे. तसेच गुजरात, नवी मुंबई, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात खून, दरोडा, घरफोडी, चोरी, विशेषतः ज्वेलर्स चोरी, मोटरवाहन चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत; तर इतर दोघांवर दोन गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२०२२ पासून अशा गुन्ह्याच्या घटना वाढत होत्या. त्या अनुषंगाने विरार गुन्हे कक्ष शाखा ३ चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, उमेश भागवत, पोलिस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, मनोज सकपाळ, सागर बावरकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव या पथकाने कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करून तिन्ही आरोपीना अटक केले आहे. आरोपींकडून आणखी मोठ्या गुन्ह्याचा उकल होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT