मुंबई

४०८ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका

CD

नवीन पनवेल, ता. १६ (वार्ताहर)ः वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसावा, या उद्देशाने पनवेल आरटीओ कार्यालयाने गेल्या चार महिन्यात जवळपास ४०८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. पनवेल आणि परिसरात रिक्षा थांबे तसेच वर्दळीच्या ठिकाणांवरील विशेष तपासणी मोहिमेतून १२ लाखाचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी असलेले वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांमुळे प्रवासी अनेकदा वेठीस धरले जात आहेत. यात मीटरप्रमाणे भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, मीटर सील नसणे, मीटर सदोष, रिफ्लेक्टर नसणे, जादा प्रवासी, प्रवाशांची उद्धटपणे वागणे, भाडे नाकारणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, परवाना नाही अशा विविध कारणांचा समावेश आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारावर वचक बसावा म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत पनवेलमधील रेल्वे स्टेशन, बस स्थानके तसेच वर्दळीच्या परिसरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
--------------------------
प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळावी, या उद्देशाने रिक्षाचालकांची तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच कागदपत्रे अपूर्ण असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.
- गजानन ठोंबरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT